आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-नितीश भेटीने चर्चांना ऊत; नितीशकुमार म्हणाले, भेटीचा राजकीय अर्थ काढू नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एका दिवसापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे निमंत्रण टाळणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी पंतप्रधान मोदी यांच्या लंचला उपस्थिती लावली. यानंतर त्यांनी मोदींसोबत चर्चाही केली. तथापि, या भेटीचा राजकीय अन्वयार्थ काढला जाऊ नये, असे त्यांनी माध्यमांकडे सांगितले.

स्पष्टीकरणही दिले
नितीश म्हणाले, २० एप्रिललाच सोनियांची भेट घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. जदयूकडून माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी बैठकीत सहभाग घेतला आहे.

तरीही मोदींसोबत बैठकीवरून कयास
नितीश- मोदी भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. सत्तेतील मित्रपक्ष राजदचे प्रमुख लालू यादवांचा दबाव मोडून काढण्यासाठी नितीश मोदींशी जवळीक वाढवत असल्याची चर्चा आहे.
 
बातम्या आणखी आहेत...