आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar In Delhi To Fight For Special Status To Bihar

जद(यू)-भाजप संबंधात कटूता ; नितीशकुमारांचे आज दिल्लीत शक्तीप्रदर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जनता दल (यू) ने आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने स्पष्ट केले आहे की, जर सार्वत्रिक निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाण्याची वेळ आली आणि भारतीय जनता पक्षासोबतचे संबंध संपुष्टात आले तर, आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची पक्षाची तयारी आहे.

दिल्लीत रविवारी पक्षाची रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्याच्या पूर्वसंध्येला पक्षाचे महासचिव आणि प्रवक्ते शिवानंद तिवारी म्हणाले, पक्षाची एनडीएसोबत निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. मात्र, आम्ही एकटेही निवडणूकीला सामोरे जाण्यास तयार आहोत. ते म्हणाले, कोणताही पक्ष जर सर्व जागांवर स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार नसेल तर त्यांचा त्यांच्या संघटन शक्तीवर विश्वास नाही हे सिद्ध होते.

नुकतेच भाजप नेते सी.पी.ठाकूर यांनी, बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्यास भाजप सक्षम असल्याचे म्हटले होते. भाजपच्या स्वबळाच्या भाषेवर तिवारी म्हणाले, आम्हीही हे ऐकले आहे. भाजप बिहारमधील सर्व ४० जागांवर स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. लोकशाहीमध्ये सर्व राजकीय पक्षांना त्यांचा जनाधार वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याबद्दल आम्हाला अडचण असण्याचे काहीही कारण नाही. आमचीही सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी आहे.