आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar CM Nitish Kumar To Be Most Credible Face Of Anti BJP Alliance: Sharad Pawar

2019 मध्ये PM पदासाठी नितीशकुमार चांगला व सक्षम पर्याय- शरद पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाला 2019 मध्ये आव्हान उभा करू शकेल असा चेहरा व पर्याय सध्या तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. भाजपविरोधी आघाडी बळकट करायची असेल तर सर्व भाजपविरोधी पक्षांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाकडे पाहायला पाहिजे. तसे झाल्यास राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा असेल. मात्र हे आपले वैयक्तिक मत आहे, याबाबत नितीशकुमार यांच्याशी कोणतेही चर्चा किंवा संवाद झालेला नाही असेही पवारांनी सांगितले.
राहुल गांधींपेक्षा सोनिया गांधी यांचे नेतृत्त्वच काँग्रेस पक्षासाठी जास्त फायद्याचे ठरेल असे सांगतानाच नितीशकुमार यांच्यात जी राजकीय परिपक्वता व अनुभव आहे तो अरविंद केजरीवाल यांच्याकडे नाही त्यामुळे देशाचे नेतृत्त्व करण्यास ते सक्षम नाहीत असेही पवारांनी अप्रत्यक्ष सुचित केले आहे.
शरद पवार यांनी 'द इकॉनॉमिक टाईम्स'ला एक मुलाखत दिली आहे. त्यात पवारांनी यावर भाष्य केले आहे. पवार म्हणाले, देशातील आजची राजकीय स्थिती पाहता भारतीय जनता पक्षाला आव्हान देईल असा एकही विरोधी पक्ष आज देशात नाही. अशा वेळी भाजपला रोखायचे असेल तर सर्व भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे. जर तसे झाले तर भाजपचा वारू रोखता येईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकतेच सर्व भाजपविरोधी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली देशातील भाजपविरोधी पक्ष एकत्र आल्यास ते भाजपला आव्हान देतील. येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिगर भाजप पक्षांचे नितीशकुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील. नितीशकुमार हे चांगला व सक्षम पर्याय ठरू शकतील. नितीशकुमार तळागाळातून आलेले नेतृत्त्व आहे. अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे. केंद्रात काम केले आहे. तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. राजकीय परिपक्वता असल्याने ते मोदींना आव्हान देऊ शकतील, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
पुढे विस्ताराने वाचा, शरद पवार सोनिया गांधी, मायावती व राहुल गांधींबाबत काय म्हणाले...