नवी दिल्ली - बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत मुख्यमंत्री नितीशकुमार हे जास्त लोकप्रिय आहेत. नितीशकुमार यांना ५२ टक्के लोकांनी पसंती दिली असून नरेंद्र मोदींना ४५ टक्के लोकांची पसंती आहे. राज्यात सत्तेच्या चाव्या अजूनही एनडीएऐवजी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जदयू-राजद-काँग्रेस आघाडीच्या पारड्यात आहेत. हे निष्कर्ष एबीपी-निल्सनच्या ताज्या सर्वेक्षणातून पुढे आले आहेत. बिहारमध्ये आताच निवडणुका झाल्यास नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला पुन्हा सत्तेची संधी मिळेल, असाही दावा यात करण्यात आला आहे.
सर्व्हेनुसार आता निवडणुका झाल्यास बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितीशकुमार यांचीच निवड होण्याची शक्यता जास्त आहे. नितीश यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला १२९ जागा मिळणार असून भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारला ११२ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर जागा केवळ २ असतील.
पुढे वाचा... भावी मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून सुशीलकुमार मोदी यांना ४२ टक्के लोकांनी पसंती दिली