आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या स्नेह भोजनाचा नितीशकुमार घेणार आस्वाद, सोनिया-राहुल गांधींचीहील घेणार भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या सन्मानात पंतप्रधानांनी डिनरचे आयोजन केले आहे. - Divya Marathi
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या सन्मानात पंतप्रधानांनी डिनरचे आयोजन केले आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाळ 24 जुलै रोजी पूर्ण होत आहे. यानिमित्ताने नरेंद्र मोदींनी शनिवारी मुखर्जींच्या सन्मानात स्नेह भोजनाचे आयोजन केले आहे. या डिनर पार्टीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारही उपस्थित राहाणार आहेत. विरोधीपक्षांच्या इतर मुख्यमंत्र्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. दिल्ली दौऱ्या दरम्यान नितीशकुमार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. 25 जुलै रोजी देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद पदभार स्वीकारतील. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांचा पराभव केला आहे. 
 
हैदराबाद हाऊसमध्ये होईल डिनर...
- पंतप्रधानांनी हैदराबाद हाऊसमध्ये डिनरचे आयोजन केले आहे. या समारोहाला भावी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मोदी कॅबिनेटमधील मंत्री, एनडीएतील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहाणार आहेत. 
- पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिनरसाठी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळीच बहुतेक मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, काही मुख्यमंत्र्यांनी त्यांना निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटले आहे. 
- केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन शनिवारी दिल्लीत असणार आहेत, मात्र ते या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार नाहीत. काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीला ते हजर राहाणार आहेत. 
- नितीशकुमार यांच्या शिवाय जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू डिनरला उपस्थित राहाणार आहेत. मुफ्ती आणि नायडू हे एनडीएच्या घटकपक्षांचे नेते आहेत. 
बातम्या आणखी आहेत...