आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar Urge No Tension On Seat Arrangement Merger Soon

युती पक्की, नितीशना मु‌‌ख्यमंत्रिपद; मुलायमांकडून घोषणा, लालूंचाही पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचा वारू रोखण्यासाठी एकजुटीने उभ्या राहणाऱ्या जनता परिवाराने बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तडजोडीतून समेट घडवला आहे. राज्यात संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलाच्या युतीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जदयूच्या नितीशकुमारांचे नाव मुक्रर झाले आहे. परिवारातील समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनीच त्यांच्या नावाची घोषणा केली. राजदच्या लालूप्रसाद यादव यांनीही त्यास पाठिंबा दिला. एवढेच नाही, तर जातीय शक्तींना रोखण्यासाठी आपण कोणतेही विष पचवण्यासही तयार असल्याचे लालूंनी म्हटले आहे. जदयूचे प्रमुख शरद यादव, मुलायमसिंह, लालू यांनी नंतर पत्रकारांशी वार्तालाप केला. धर्मनिरपेक्ष शक्तींची एकजूट झाल्याने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा राज्यात पराभव अटळ असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
जून २०१३ मध्ये नितीशकुमार यांनी भाजपप्रणीत रालोआशी काडीमोड घेतला होता.

माझा लढा सुरूच आहे
नितीश यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यास लालूंचीही हरकत नाही. भाजपसारख्या जातीय शक्तींविरुद्ध लढण्याचा आम्हाला इतिहास आहे. अयोध्या वादापासून हा लढा सुरूच आहे.
- मुलायमसिंह यादव, अध्यक्ष, समाजवादी पार्टी

माझा छळ चाललाय
जातीय शक्तींना रोखण्यासाठी कोणतेही विष पचवण्याचीही माझी तयारी आहे. आम्ही भाजपचा रथ रोखला होता. त्याची शिक्षा आजपर्यंत भोगतो आहे. माझा छळ चालवला आहे.
लालूप्रसाद यादव, प्रमुख, राष्ट्रीय जनता दल

नितीश यांनी जनाधार गमावला - रुडी : राजद-जदयू युतीवर भाजप नेते व केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रुडी पाटण्यात म्हणाले की, लालूंशी हातमिळवणी करून नितीश यांनी त्यांना होता नव्हता तेवढा जनाधार गमावला आहे. आता बिहारमध्ये एनडीएचेच सरकार प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीशी चर्चा करू : लालू
मने जुळली आहेत. जागांचा मुद्दा गौण आहे. लोकदलापासून आमचे नाते आहे. राज्यसभेच्या तीन जागांच्या निवडणुकीत भाजपला मात देण्यात माझाच पुढाकार होता, असे लालू म्हणाले. काँग्रेसशिवाय डावे पक्ष व राष्ट्रवादीला जनता परिवाराच्या या नव्या युतीत घेण्याच्या मुद्द्यावर लालू म्हणाले, या दोन्ही पक्षांशी आम्ही चर्चा करणार आहोत.

अामचे ठरलेले नाही : तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगळवारपासून पाटण्यात दोन दिवसांचे अधिवेशन होत आहे. पक्षाचे नेते तेथे असतील. तथापि, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना युतीबाबत छेडले असता आमचे काहीही ठरलेले नाही. शरद पवार निर्णय घेतील, असे ते म्ह्णाले.


पुढील स्लाइडमध्ये, सर्व्हेक्षण काय म्हणते