आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar Vetoes Narendra Modi, Gives BJP Till December

टोपी स्वीकारतो, टिळा लावतो तोच पंतप्रधान व्हावा : नितीशकुमार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मोदींचे नाव जाहीर होताच जनता दल (संयुक्त) एनडीएमधून बाहेर पडेल. रविवारी जदच्या राष्ट्रीय अधिवेशनात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अधिकृतरीत्या ही घोषणा केली.

पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी या मुद्द्यावर लवचिक भूमिका घेतली असली तरी नितीशकुमार यांनी मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोदींवरच टीका केली. पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव, विकासाचे गुजरात मॉडेल आणि मोदींची देशभर हवा पसरवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना नितीश यांनी सपशेल धुडकावून लावले. भाजप आम्हाला एनडीएमध्ये ठेवू इच्छित आहे किंवा नाही हे भाजपनेच ठरवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

धर्म नव्हे राजधर्म ओळखा, भाजपला इशारा
वाजपेयींचे कौतुक करत ते म्हणाले की, वयाने आम्ही त्यांच्यापेक्षा खूप लहान होतो, तरीही ते प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत. सर्वांना सोबत घेऊन पुढे जात. त्यांचासारखा राजधर्म पाळणार्‍या पंतप्रधानाची देशाला गरज आहे.
गेल्या 17 वर्षांपासून भाजपसोबत आघाडी टिकल्याचे कारण म्हणजे त्यांनी अजेंडा नेहमी दूर ठेवला. आता त्यांनी मार्ग बदलल्यास सत्ता सोडू, पण धर्मनिरपेक्ष तत्त्वांशी तडजोड करणार नाही. आम्ही पायउतार होऊ.

कुपोषणाची वस्तुस्थिती नितीश यांनी का लपवली?
नितीशकुमार यांनी गुजरातच्या विकासाचे मॉडेल तेथे कुपोषण असल्याचे सांगत फेटाळून लावले. वस्तुस्थिती अशी की, 2007 मध्ये कुपोषणाचा स्तर 71 % होता. जो 2011 मध्ये 39% होता. दुसरीकडे बिहारमध्ये 2011 मध्ये सर्वाधिक 82% उपोषण आहे.

@कुपोषणाचे पाणी किती खोल?
संदर्भ : गुजरातमधील वाढते कुपोषण आणि गंभीर होत जाणार्‍या दुष्काळाचा दाखल देत मोदींचे विकासाचे मॉडेल फेटाळले. गुजरात आधी बिहारमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिल्याचे श्रेय घेतले.

@ बिहारी ‘अटल’ कशासाठी ?
संदर्भ : लोकप्रियतेमध्ये मोदींची तुलना वाजपेयींशी करणार्‍या भाजपमधील गटास लक्ष्य केले. टीका आहे. राजकीय इशारा लक्षात घेता अटल सोबत ‘बिहारी’ही येते, याची सूचक जाणिव करून दिली.

स्वत:चेही गोडवे गायले
नितीश म्हणाले की, आम्ही पंचायतींमध्ये महिलांना 50 % आरक्षण दिले आहे. त्यांना विकासाचे वाटेकरी केले. सर्वांची मने जिंकली. सर्वांशी समान वागणूक दिली.

पण मला पंतप्रधान व्हायचे नाही; कारण देवेगौडांची अवस्था विसरलेलो नाही
नीतिश म्हणाले,‘आपण पंतप्रधान बनू शकत नाही, हे मी जाणतो. 20 - 25 खासदारांच्या पक्षाने असे पाऊल उचलूच नये. गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर यांच्या अवस्थेतून हा धडा मिळतो. आम्ही भाजपसोबत राहू इच्छितो. पण मोदी नकोत.’