आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमार यांचे ‘डर्टी पॉलिटिक्स’ : भाजप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिहारमधील राजकीय नाट्य केवळ भारतीय जनता पार्टीच्या इशा-यावरून सुरू आहे, असा आरोप करणारे जदयूचे नेते नितीशकुमार यांच्यावर गुरुवारी भाजपने प्रतिहल्ला चढवला. नितीशकुमार बिहारमध्ये डर्टी पॉलिटिक्स खेळत आहेत, असे पक्षाने म्हटले आहे.
हे प्रकरण विधिमंडळातील आहे. तेथेच ते सोडवले पाहिजे. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी मांझी यांना २० फेब्रुवारी रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. परंतु नितीशकुमार अत्यंत घाणेरडे राजकारण खेळत आहेत, असे भाजपचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावर असलेल्या जितनराम मांझी यांनी घोषणाबाजी करत जणू खैरात सुरू केली आहे. पाच एकरपर्यंत शेती असलेल्या छोट्या शेतक-यांना वीज मोफत देण्याची घोषणा मांझी यांनी गुरुवारी केली. मांझी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.