आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा पाक दौराः नितीशने केला सपोर्ट, लालू म्‍हणाले- 56 इंच छाती कुठे गेली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/पटणा - बिहारचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या पाकिस्‍तान दौऱ्याचे शुक्रवारी कौतुक केले. दरम्‍यान, लालूप्रसाद यादव यांनी पठाणकोट हल्‍ल्‍यावरून मोदींवर टिकास्‍त्र सोडले. लालू म्‍हणाले, ''हवाई दलाच्‍या तळावर झालेल्‍या हल्‍ल्‍याचे मोदींना उत्‍तर द्यावे लागेल. त्‍यांच्‍या 56 इंच छातीचे काय झाले ?'' असा प्रश्‍नही त्‍यांनी उपस्‍थ‍ित केला.
नितीशकुमार नेमके काय म्‍हणाले...
- ही भेट म्‍हणजे शत्रुत्‍वाला मित्रत्‍वामध्‍ये बदलण्‍याचा प्रयत्‍न आहे.
- यामुळे दोन्‍ही देशांतील संबंधामध्‍ये सुधारणा होईल. प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागतील.
लालूंनी केली टीका
- आरजेडी सुप्रीमो लालू म्‍हणाले, ''भाजप म्‍हणते की बिहारमध्‍ये जंगल राज-2 आहे. पण, आता त्‍यांनी पठाणकोट हल्‍ल्‍यावर का चुप्‍पी साधली?''
- ''मोदी म्‍हणतात, पाकिस्‍तान आमच्‍या डोळ्यांत डोळे भिडवून चर्चा करू शकत नाही. मात्र, आता दहशतवादी आपल्‍या देशात कसे घुसले ?''
- ''भाजप यावर का चर्चा करत नाही?' आरएसएसचे लोकोहो, देश तुमच्‍या हातात सुरक्षित राहणार नाही. ''
- '' मोदी पाकिस्‍तानात बिर्याणी खायला गेले होते का ?''
पुढील स्लाइड्सवर वाचा, शरीफ यांच्या आईचे चरण स्पर्श केले तेव्हा...