आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitishkumar And Laluprasad Yadav News In Marathi

नितीश-लालू हातमिळवणी; मतांचा टक्का घटल्याने एकत्र येण्याचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/ नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठ्या पराभवाने बिहारमधील एकेकाळच्या राजकीय वैर्‍यांनी एकत्र आणण्याची किमया केली आहे. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव आणि जदयू नेते नितीश कुमार 20 वर्षांनंतर एकत्र आले आहेत.

लालूंनी जीतन राम मांझी सरकारला विनाअट बाहेरून पाठिंब्याची गुरूवारी घोषणा केली. नितीश-लालू 20 वर्षांपूर्वी जनता दलमध्ये होते. त्यावेळी उभयतांना बडे भाई-छोटे भाई म्हणून ओळखले जात होते. परंतु नितीश यांनी वेगळे होऊन समता पार्टी स्थापन केली. त्यानंतर जनता दल युनायटेड स्थापन झाले. जदयू आणि राजदचा मतांचा टक्का 2009 च्या तुलनेत 44 टक्क्यांनी घटला आहे. भाजपचा मात्र 16 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे अस्तित्व राखण्यासाठी दोघांनी हा निर्णय घेतला.

दरम्यान, नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर जनता दल युनायटेडने जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्रिपद बहाल केले होते. आता शुक्रवारी, 23 मे रोजी मांझी यांच्या सरकारला बिहारच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. 237 सदस्यांच्या बिहार विधानसभेत 117 जदयूचे संख्याबळ असून राजदचे 21 सदस्य आहेत, तर विधानसभा अध्यक्षांसह भाजपचे 88 सदस्य बिहार विधानसभेत आहेत. राजदच्या पाठिंब्याने मांझी सरकारला बळकटी मिळणार आहे.