आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हेरगिरी\'मुळे नरेंद्र मोदी तर सहका-यांच्या वक्तव्याने नितीशकुमार त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/ नवी दिल्ली - भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या समस्या वाढल्या आहेत. मोदींचे विश्वासू अमित शाह यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी कोणत्यातरी 'साहेबां'च्या सांगण्यावरून गुजरात पोलिसांना बंगळुरूच्या एका मुलीची हेरगिरी करण्यास सांगितले होते. शहा यांच्यावरील हे आरोप मोदींसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे, जनता दल (यू)चे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांच्या पक्षातील वाढते मोदी प्रेम रोखण्यास असमर्थ दिसत आहेत. जेडी (यू) नेते शिवानंद तिवारी यांनी पुन्हा एकदा मोदींची स्तूती केली आहे. पक्षाच्या राजगिर येथील शिबीरात सर्व नेत्यांच्या समोर तिवारींनी मोदींवर स्तूती सुमने उधळली होती.