Home »National »Delhi» Nizamuddin Dargah Khadim And One Indian Clerics Returns India Missing In Pak

असिफ निजामी खोटे बोलताय, देशविरोधी कृत्यासाठी गेले होते पाकिस्तानात- सुब्रमण्यम स्वामी

वृत्तसंस्था | Mar 21, 2017, 04:56 AM IST

नवी दिल्ली-हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे सज्जादानशीन आणि त्यांचा भाचा सोमवारी राजधानी दिल्लीत परतले. काही दिवसांपूर्वी ते पाकिस्तानात बेपत्ता झाले होते. ते स्वत: रहस्यमयरीत्या कसे काय बेपत्ता झाले होते, याबाबत ते सांगत नाहीत.

हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे सज्जादानशीन ८० वर्षीय सय्यद आसिफ निजामी व ज्येष्ठ सुफी उमेला नाजिम अली निजामी पाकिस्तान इंटरनॅशल एअर लाइन्सच्या विमानाने नवी दिल्लीत उतरले.
हजरत निझामुद्दीन दर्ग्याचे प्रमुख मौलवी सईद आसीफ निझामी (८० वर्षे) आणि त्यांचा पुतण्या- ज्येष्ठ सुफी मौलवी नाझीम अली निझामी हे दोघे सोमवारी मायदेशी सुखरूप परतले. ते पाकिस्तानमध्ये काही दिवसांपासून बेपत्ता झाले होते.

दोन्ही मौलवी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सच्या विमानाने नवी दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. स्वराज यांनीच हा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित केला होता.
दोन्ही मौलवींनी पाकिस्तानमधील वास्तव्याबाबत फार काही सांगितले नाही, पण ‘या दोन्ही मौलवींचा रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेशी संबंध असल्याचा दावा कराचीतील एका उर्दू दैनिकाने केला होता, त्याच्या आधारावर दोघांना विमानातून उतरवून घेण्यात आले होते,’ असा दावा आसीफ निझामी यांचे चिंरजीव साजिद निझामी यांनी केला.
पाकचा दावा फेटाळला : हे दोन्ही मौलवी सिंधच्या अंतर्गत भागात होते, तेथे संवादाचे नेटवर्क नसल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असा दावा पाकिस्तानने केला होता. नाझीम अली निझामी यांनी हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला. ते म्हणाले की, ‘सिंधच्या अंतर्गत भागात जाण्यासाठी आमच्याकडे व्हिसा नव्हता. मग आम्ही तेथे कसे गेलो असू? संवादाचे नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ नसल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.’
बळाचा वापर झाला नाही :
पाकिस्तानी प्रशासनाने तुम्हाला ताब्यात घेतले होते का, या प्रश्नाला निझामी यांनी ‘होय,’ असे उत्तर दिले. या प्रकरणात आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था सहभागी होती का आणि त्यांनी तुमचा छळ केला का, या प्रश्नावर निझामी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पण ‘आमच्यावर बळाचा वापर करण्यात आला नाही,’ असेही स्पष्ट केले.


पुढील स्लाइडवर वाचा... काय आहे हे प्रकरण? आणि पाक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली चुकीची माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended