नवी दिल्ली - हुंडाबळीच्या प्रकरणात टाकली जाणारी आरोपींची नावे पतीच्या रक्ताच्या नात्यातली, वैवाहिक किंवा दत्तक नातेसंबंधाची असतील तरच त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकेल. सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. मात्र, या नातेसंबंधांच्या बाहेरील लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खटला चालवला जाऊ शकेल. हुंडाबळी प्रकरणात पतीच्या नातेसंबंधातील एका व्यक्तीविरुद्ध स्थानिक न्यायालयाने बजावलेले समन्स हरियाणा हायकोर्टाने रद्द केले होते. त्याला पंजाबने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मृत महिलेच्या पतीच्या काकूचा भाऊ आहे म्हणून संबंधित व्यक्ती ‘पतीचा नातेवाईक’ या व्याख्येत बसत नसल्याचे न्यायालयाने म्हटले.