आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Attack On Indian Troops Possible Without Pakistan Army

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानच्या स्पेशल आर्मीने केला हल्ला, संरक्षण मंत्र्यांचे लोकसभेत निवेदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मिर मधील पूँछ मध्ये झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या स्पेशल आर्मीचा सहभाग होता. असे, निवेदन संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅटनी यांनी लोकसभेत केले आहे. ते म्हणाले, 'भारत अशा कारवायांना नक्की उत्तर देईल.' अ‍ॅटनी यांनी याआधी पाकिस्तानी लष्कराच्या पोषाखातील दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे म्हटले होते. विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या, 'आम्ही संरक्षण मंत्र्याचे आभारी आहोत, त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे.'

त्याआधी, संसदेच्या आजच्या (गुरुवार) कामकाजाला गोंधळातच सुरवात झाली. लोकसभा आणि राज्यसभेत तेलंगणाला स्वतंत्र राज्य केल्याच्या विरोधात सदस्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर राज्यसभेत गोंधळ घालणा-या सदस्यांची यादी तयार करण्यात आली आणि या गोंधळात भरच पडली. या यादीतील 22 नावांमध्ये 20 भारतीय जनता पक्षांचे तर दोन सदस्य तेलगू देशम पक्षाचे आहेत. या यादीत भाजप सदस्यांची नावे आल्यामुळे विरोधीपक्ष नेते अरुण जेटली यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहात गोंधळ घालणा-या सत्ताधारी पक्षाचे सदस्य देखील होते, मात्र त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यानंतर भाजप सदस्यांनी सभात्याग केला.

पुढील स्लाइडमध्ये, अडवाणी संतप्त आणि पाकिस्तानच्या उलट्या बोंबा