आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Back, Centre Should Call Back Its IAS Officers, Threaten Ramgopal Yadav

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर केंद्राने आयएएस परत बोलवावेत!, रामगोपाल यादवची केंद्राला धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ/नवी दिल्ली - एकीकडे प्रत्येकच राज्य स्वायत्ततेची मागणी करत आहे, तर उत्तर प्रदेश मात्र देशात राहूनच एका वेगळय़ा देशासारखे वागत आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या समाजवादी पार्टीने सोमवारी केलेल्या वक्तव्यावरून तरी निदान असेच वाटते. संसदेच्या दारातच पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी केंद्राला उघड उघड धमकीच दिली. निलंबित आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती यांच्या निलंबनप्रकरणी ढवळाढवळ बंद करा. आपल्या आयएएस अधिकार्‍याची एवढीच चिंता वाटत असेल तर केंद्राने त्यांना माघारी बोलावून घ्यावे. आम्ही राज्यातील अधिकार्‍यांच्या जोरावर राज्याचा गाडा हाकू, असे यादव यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी यांनी मनमोहन यांना पाठवलेल्या पत्रापासून वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर केंद्राने यूपी सरकारकडे अहवाल मागितला. नियमात जे बसेल, तेच आम्ही करू, असे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सोमवारी स्पष्ट केले. यावर तिळपापड झालेले मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले की, आमचा निर्णय योग्य आहे. बर्‍याच मुलांना चूक केल्यानंतर आई-वडील, शिक्षकांचा मार खावा लागतो असे उदाहरण देऊन अधिकारी चूक करतो तेव्हा त्याला शिक्षा करावीच लागते, असे अखिलेश म्हणाले.


सपाने असे का केले?
कारण मुलायम आणि अखिलेश हे चांगल्या प्रकारे जाणून आहेत की, दुर्गाशक्तींची भूमिका योग्यच होती व केवळ एका समुदायाला संतुष्ट करण्यासाठी राज्य सरकारने त्यांना निलंबित केले. या निर्णयापासून ते माघार घेऊ इच्छित नाहीत. याचे कारण केंद्र सरकारला पावलोपावली त्यांची गरज आहे. इच्छा असूनही केंद्र त्यांच्याविरोधात जाऊ शकत नाही. जेव्हापासून उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी सत्तेत आली, तेव्हापासून मुलायम यांनी सीबीआयला घाबरणे सोडून दिले आहे.


केंद्र सरकार हतबल का ?
केंद्र हतबल असल्यामुळे काहीच करू शकत नाही. हरियाणाच्या खेमका यांचा एकीकडे छळ करते. दुसरीकडे दुर्गाशक्तीवरील अन्यायाबाबत काहीच बोलू शकत नाही. याच कारणामुळे पंतप्रधानांनीही या प्रकरणात नियमानुसार कारवाई करू, असे सांगून वेळ मारून नेली. याचा अर्थ ते काहीच करणार नाहीत. वास्तविक नियम नव्हे, ते लागू करणार्‍या व्यक्तीच्या हाती कारवाई असते. येथे नेमके तसेच झाले. नियम लागू करणारी व्यक्तीच शांत आहे. दुर्गा शक्ती प्रकरणी सोनियांनी लिहिलेल्या पत्राचे परिणाम लगेच दिसले. ज्या दिवशी पत्र लिहिले त्याच दिवशी उत्तर प्रदेश सरकारने अहवाल म्हणून थेट चार्जशीट दिले.


दुर्गा यांचे काय होणार?
राज्य सरकार एखाद्या आयएएस अधिकार्‍याला 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ निलंबित ठेवू शकत नाही. त्यानंतर अधिकार्‍याला केंद्राकडे परत पाठवावे लागते. चार्जशीटला उत्तर मिळाल्यावर उत्तर प्रदेश सरकार दुर्गाशक्तींचे निलंबन रद्दही करू शकते.