आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाग्रामला केंद्राचा निधी नाही, खासदार रामदास तडस यांनी घेतली मोदींची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वर्धा येथील भाजपचे खासदार रामदास तडस यांनी शुक्रवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेऊन महात्मा गांधींचे सेवाग्राम अाश्रम अाणि गावाच्या िवकासासाठी घाेषित करण्यात अालेले ५३७ काेटी रुपये अद्याप देण्यात आला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी पंतप्रधानांना निवेदन दिले. सेवाग्रामकडे जगाचे लक्ष जावे यासाठी ‘गांधी फाॅर टुमाराे’ या परियाेजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात अालेला अाहे.
सेवाग्राम अाश्रमात स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सेवाग्राममधील प्रत्येक हालचालींवर इंग्रज लक्ष ठेवून राहायचे. या परिसरात गांधीजींच्या स्मृती अद्यापही जाेपासल्या जातात तर शेजारीच असलेल्या पवनार येथे भूदान यज्ञ चळवळीचे प्रणेते अाचार्य विनाेबा भावे यांचे वास्तव्य हाेते. या दाेन्ही स्थळांना अांतरराष्ट्रीय पर्यटनाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी या वेळी खासदार तडस यांनी पंतप्रधानांकडे केली. सेवाग्राम अाश्रमाची दुरुस्ती न झाल्यास गांधीजींच्या अातापर्यंत जाेपासलेल्या स्मृती नष्ट हाेतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी हा निधी लवकरच देण्यात येईल. त्याबाबत संबंधितांना सूचना केल्या जातील, असे अाश्वासन दिले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचे गावही हाेणार अादर्श