आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस सबसिडीसाठी आधारची सक्ती नाही - पेट्रोलियम मंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलिंडरवर सुधारित रोख अनुदान योजनेअंतर्गत दिली जाणारी सबसिडी ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आधार क्रमांक सक्तीचा नाही. केवळ बँक खाते क्रमांक दिलेला असेल तरीही हा लाभ मिळू शकेल. नववर्षात जानेवारीपासून ग्राहकांना थेट बँक खात्यावर अनुदान मिळणार आहे. पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात प्रधान यांनी सांगितले, या योजनेत समाविष्ट असलेल्या ग्राहकांना घरगुती वापराचे सिलिंडर बाजारभावानेच खरेदी करावे लागेल. मात्र, त्यावर दिली जाणारी सबसिडी सबंधित ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

गॅस सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांसमोर दोन्ही पर्याय असून ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे तो त्यांनी बँक खात्याशी जोडला असेल तर त्यांना थेट खात्यावर सबसिडीची रक्कम मिळेल. मात्र, ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही अशा ग्राहकांना बँक खाते क्रमांक संबंिधत गॅस कंपनीच्या माध्यमातून ग्राहक क्रमांकाशी जोडावा लागेल. या खात्यावर रोख स्वरूपात सबसिडीची रक्कम जमा केली जाईल.