आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश परीक्षेत आेबीसींना सवलत मिळणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जेएनयूमध्ये पुढील शैक्षणिक सत्रात एमफिल व पीएच.डी प्रवेश परीक्षेत आेबीसी उमेदवारांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. परंतु परीक्षेसाठी लागणाऱ्या पात्रतेच्या अटींमध्ये मात्र पाच गुणांची सुट दिली जाणार आहे. हा निर्णय गेल्या आठवड्यात विद्यापीठाच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध अधिष्ठातांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

सध्या विद्यापीठाच्या अनेक अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी आेबीसी व खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना समान नियम आहेत. पात्रता परीक्षेत किमान ५५ टक्के गुण अनिवार्य आहेत. अनुसूचित जाती- जमातीच्या उमेदवारांना केवळ ३४ टक्के गुणांसह परीक्षेत उत्तीर्ण होता येते. आेबीसी उमेदवारांना प्रवेश परीक्षेत आणि मुलाखतीच्या पातळीवर १० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे खुल्या वर्गातील उमेदवारांना परीक्षेत ४० गुण आणि आेबीसींना ३६ गुण अनिवार्य ठरतात. गेल्या काही दिवसांपासून आेबीसी विद्यार्थी दोन्ही टप्प्यावर सवलत मागू लागले आहेत. या मागणीसाठी एका उमेदवाराने न्यायालयात दाद देखील मागितली होती. दोन पातळ्यावर आेबीसी वर्गाला सवलत देणे योग्य होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. त्यांना पात्रता अटींबाबत सूट दिली जात आहे. परंतु त्यांना परीक्षा आणि मुलाखतीत मात्र खुल्या वर्गाशी मुकाबला करावा लागेल.

दरम्यान, पात्रता परीक्षेत आेबीसीचे उमेदवार पात्र ठरू शकले नाहीत. अर्थात तो कोटा भरला गेला नाही तर रिक्त जागा खुल्या वर्गातील उमेदवारांना देण्यात येईल, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.