आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Death Penalty For Italian Marines, Centre Tells Supreme Court News In Marathi

इटालियन खलाशांबाबत सरकार दोन पावले मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दोन भारतीय मच्छीमारांच्या हत्येतील आरोपी इटली नौदलाच्या दोन जवानांविरुद्ध सागरी चाचेगिरीविरोधी कायद्याअंतर्गत (एसयूए) खटला चालणार नाही. केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला यासंदर्भात माहिती दिली. यामुळे दोन्ही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले.

मॅसिमिलियानो लातोरे आणि सालवातोर गिरोने अशी आरोपींची नावे आहेत. 2012 मध्ये त्यांना अटक केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. इटलीच्या दबावानंतर भारताने या प्रकरणात सौम्य भूमिका घेत एसयूएची तरतूद हटवली आहे. अँटर्नी जनरल जी. ई. वहानवटी यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला केंद्राच्या निर्णयाची माहिती दिली. राष्ट्रीय तपास संस्था आरोपींविरोधात चौकशी सुरू ठेवणार आहे. आरोपींच्या वकिलाने ही चौकशी बंद करण्याची मागणी केली होती. एसयूएची कलमे हटवल्यानंतर एनआयएची चौकशी संपुष्टात येईल. यावर केंद्राने केंद्राला नोटीस जारी केली असून उत्तरासाठी आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.