आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Decision Of Facebook, Twitter Server Ravishankar Prasad

भारतात फेसबुक, टि्वटरच्या सर्व्हरचा निर्णय अद्याप नाही, प्रसाद यांची लोकसभेत माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फेसबुक, टि्वटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचे सर्व्हर भारतात लावण्यासंदर्भात अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, इंटरनेटवरील बेकायदेशीर मजकुराला आळा घालण्यासाठी सरकार या कंपन्यांच्या सातत्याने संपर्कात आहे, अशी माहिती दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. प्रसाद यांनी सांगितले की, २०१३-१४ या वर्षात मनीऑर्डरचे वितरण न केल्याबद्दल टपाल खात्यातील ३०० कर्मचा-यांना दंड करण्यात आला. या कालावधीत १२, २४१ कोटी रुपयांचे १०.९ कोटी मनीऑर्डर पाठवण्यात आले होते. पैकी ८० हजार मनीऑर्डरबाबत तक्रार मिळाली होती.

पर्यटकांसाठी अॅप बनवण्याची शिफारस : संसदेच्या एका स्थायी समितीने देशात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोबाइल अॅप तयार करण्याची शिफारस सरकारला केली आहे. देश - विदेशातील पर्यटकांना मोबाइलवर भारतातील पर्यटन स्थळे, हॉटेल्स, रेल्वे, विमान सेवा, त्यांचे िकरायाचे दर, खाने - पिणे, निवास व्यवस्था, गाइड आदींची प्रामाणिक माहिती मिळवण्यासाठी अॅप बनवावा, अशी शिफारस कुंवर सिंह दीप यांच्या अध्यक्षतेखालील पर्यटन मंत्रालयशी संबंधित समितीने अहवालात केली आहे.