आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Doubt On Indian Muslim\'s Patriotism, Says PM Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका घेण्याचा प्रश्नच नाही, मुलाखतीत पंतप्रधानांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : सीएनएन वाहिनीच्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - भारतीय मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका घेण्याचा प्रश्नच नाही. भारतीय मुस्लीम भारतासाठी जगतात आणि भारतासाठीच प्राण देतात, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्थापनेनंतरच्या पहिल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. या महिन्याच्या अखेरिस त्यांच्या ऐतिहासिक अमेरिका दौ-यापूर्वी सीएनएन वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत मोदींनी भारत आणि अमेरिकेच्या संस्कृतीमध्ये आणि इतिहासात मोठे साम्य असल्याचे म्हटले आहे.

भारत-अमेरिकेच्या नात्यांमध्ये अनेक चढ उतार आल्याचे मोदींनी मुलाखतीत मान्य केले आहे. पण 21 व्या शतकात हे नाते एका नव्या उंचीवर नेण्यास कटीबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान धोरणात्सक भागीदारी होणार असल्याचा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे. भारत-अमेरिका यांच्यातील संबंध केवळ दिल्ली आणि वाशिंग्टनच्या सीमेपुरते नाहीत. त्याची सीमा अत्यंत व्यापक असल्याचे मोदींनी सांगितले.
फरिद झकारियांचे प्रश्न आणि मोदींची उत्तरे
झकारिया : अमेरिकेत आणि भारतातही अनेक असे लोक आहेत ज्यांना दोन्ही देशांतील संबंध सुधारावे असे वाटते. जगातील सर्वात जुनी लोकशाही आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही हे या देशांचे वैशिष्टय. पण दोन्ही देशांमध्ये अनेकदा तणाव निर्माण झाले. त्यामुळे दोन्ही देशांत खरंच धोरणात्मक संबंध स्थापित होतील, असे वाटते का?
मोदी : मी याचे एका शब्दात उत्तर देईल. पूर्ण विश्वासाने मी सांगेल होय. सविस्तर सांगायचे तर, भारत अमेरिकेत अनेक समान बाबी आहेत. गेल्या काही दशकांचा विचार केल्यास दोन गोष्टी लक्षात येतात. अमेरिकेत जगातील प्रत्येक काना कोप-याचे लोक आहेत. तर दुसरी बाब म्हणजे भारतीय नागरिक जगाच्या काना कोप-यात आहेत. ही दोन्ही देशांची वैशिष्ट्ये आहेत. गेल्या काही दशकांत नात्यात तणाव आला असला तरी आम्ही मोठ्या बदलाचे साक्षीदार बनणार आहोत. आमचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. भारत आणि अमेरिका इतिहास आणि संस्कृतीचा विचार करता एकमेकांशी संलग्न आहेत. त्यामुळे हे संबंध अधिक दृढ होतील.

झकारिया : आतपर्यंत ओबामा प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेच तुमच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना अनेकवेळा इथे यावे लागले आहेत. त्यामुळे वॉशिंग्टनला खरंच संबंध सुधारण्याची इच्छा आहे, असे तुम्हाला वाटते का?
मोदी : भारत-अमेरिकेचे संबंधांकडे दिल्ली आणि वॉशिंग्टन सीमेच्या बंधनातून पाहायला नको. त्याचा परीघ बराच मोठा आहे. चांगली बाब म्हणजे दिल्ली आणि वॉशिंग्टन दोन्हींची याबाबत सकारात्मक भूमिका आहे.

झकारिया : अलकायदाच्या प्रमुखांनी एका व्हिडिओद्वारे भारत आणि दक्षिण आशियामध्ये पाळंमुळं रोवण्याचे संकेत दिले आहेत. काश्मीर, गुजरातमध्ये संघर्षाचा सामना करणा-या मुस्लीमांना मुक्त करायचे असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांना यात यश मिळेल याबाबत आपण चिंतित आहात?
मोदी : मला वाटते तेच आमच्या देशातील मुस्लीमांवर अन्याय करत आहेत. भारतीय मुस्लीम कोणाच्या तालावर नाचतील असे त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. भारतीय मुस्लीम हे भारतासाठी जगतात आणि भारतासाठी प्राण देण्यास तयार असतात. भारताचे वाईट कधीही त्यांना मान्य नसेल.

झकारिया : आपल्या देशात 17 कोटी मुस्लीम आहेत. ही एक चांगली बाब आहे. विशेष म्हणजे आपल्या देशात अल कायदाचे अत्यंत तुरळक नसल्याप्रमाणे सदस्य आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात मात्र मोठी संख्या आहे. मग ते या समुदायात नाहीत का?
मोदी : सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कोणत्याही प्रकारचे मानसिक अथवा धार्मिक स्तरावरील विश्लेषण करण्याचा काहीही अधिकार नाही. पण मानवतेचा वापर विश्वाच्या कल्याणासाठी करावा की नाही हा प्रश्न आहे. मानवतावाद्यांनी एक व्हायला हवे. कारण हे मानवतेसाठी एक संकट आहे. एखाद्या देशाविरोधात नाही.