आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Evidence Against Ashok Chavan, Governance Objection To Central Investigation Bureau

अशोक चव्हाणांविरुद्ध कणभरही पुरावा नाही, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तर्काला राज्यपालांचा आक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आदर्श घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी सीबीआयने दिलेल्या पुराव्यांत कणभरही तथ्य नाही, असे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी म्हटले आहे. केवळ गृहीतके व तर्काच्या आधारे हे आरोप करण्यात आले आहेत. या पुराव्यांचा सर्वांगाने विचार केल्यानंतर सकृतदर्शनीही खटला चालवला जाऊ शकत नाही अशा शब्दांत राज्यपालांनी सीबीआयच्या तर्काला आक्षेप घेतला.
चव्हाणांविरुद्ध खटल्याची सीबीआयची विनंती राज्यपालांनी फेटाळली होती. त्यामागची कारणे तपासण्यासाठी केंद्रीय माहिती आयोगाचे माजी अध्यक्ष शैलेश गांधी यांनी माहिती अधिकाराखाली विचारणा केली. त्याला राज्यपालांनी उत्तर दिले आहे. आदर्शमध्ये लष्कराव्यतिरिक्त लोकांना सामावून घेण्यासाठी अनेकांशी चर्चा सुरू होती. यासंबंधी मुख्य आरोपीने जून 2000 पूर्वीच विविध अधिका-यांशी पत्रव्यवहार केला होता, असे सीबीआयने म्हटले आहे. त्यामुळे त्यावेळी महसूलमंत्री असलेल्या चव्हाण यांनी जून 2000 मध्ये सोसायटीत इतर नागरिकांनाही 40 टक्के वाटा मिळावा असा प्रस्ताव प्रथम पाठवल्याचे म्हणता येणार नाही, असे राज्यपालांनी म्हटले आहे. सोसायटीत इतरांचा समावेश करण्याच्या ‘रिपोर्टेडली प्रपोज’ या सीबीआयच्या वाक्याचाही राज्यपालांनी समाचार घेतला. सर्व आरोपांवर आधारित खटलाच उभा राहत नाही, असा शेरा राज्यपालांनी मारला.