आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेताजींच्या रशियातील वास्तव्याचा पुरावा नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सोव्हिएत युनियन(रशिया)मधील १९५४ आणि त्यानंतरच्या वास्तव्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. नवीन २५ फाइल्सच्या(संचिका) छाननीनंतर या सूत्रांनी हे जाहीर केले आहे. या फाइल्स आता खुल्या केल्या आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोस विमानाने रशियाला गेले आणि १९४५ मध्ये तैपेई येथे विमान अपघातात त्याचा मृत्यू झालाच नाही. या अाशयातील एका नव्या दाव्याला-विश्वासाला आता आव्हान मिळाले आहे. म्हणजेच दुसऱ्या अर्थाने ते रशियात गेलेच नाही आणि त्यांचा विमान अपघातातच तैपेई येथे मृत्यू झाला होता या पारंपरिक समजाला पुष्टीच मिळाली आहे.
मॉस्कोतील भारतीय दूतावासाला पाठविलेल्या ८ जानेवारी १९९२ च्या एका पत्रात रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, मध्यवर्ती आणि गणराज्याच्या पुराभिलेखागारातील दस्तएेवजानुसार आझाद हिंद सेनेचे प्रमुख आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १९४५ आणि त्यानंतरच्या तत्कालीन सोव्हिएत युनियन-रशियातील वास्तव्याची कुठलीही माहिती, पुरावा उपलब्ध नाही.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ७० वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता होणे हे अद्यापही एक गूढच राहिले आहे. यावर दोन चौकशी आयोग नेमले गेले त्यांच्या निष्कर्षांनुसार नेताजी हे तैपेई येथेच १८ ऑगस्ट १९४५ रोजी एका विमान अपघातात मृत्यू पावले आहेत. न्यायमूर्ती एम. के. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील तिसऱ्या चौकशी समितीने मात्र नेताजींच्या मृत्यूचा दावा खोडून काढला आणि त्यांच्या मते नेताजी त्या वेळी जिवंत होते.

सांस्कृतिक सचिव एन. के. सिन्हा यांनी नुकतीच लोकांचे कुतूहल शमविणारी नेताजी गूढ मृत्यू प्रकरणाशी संबंधित नव्या २५ छाननी केलेल्या फाइल्सची सहावी बॅच ऑनलाइन रिलीज केली आहे. या फाइल्स परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या ताब्यात होत्या. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नेताजींच्या संबंधित १०० फाइल्स २३ जानेवारी नेताजींच्या ११९ व्या जयंतीच्या रोजी जनतेसाठी खुल्या केल्या होत्या. तदनंतर ५० फाइल्सचा दुसरा जत्था मार्चमध्ये खुला केला होता. यापुढेदेखील प्रत्येक वेळी नेताजींसंबंधीच्या २५ फाइल्स येणाऱ्या महिन्यांमध्ये सोयीप्रमाणे खुल्या वा प्रकाशित केल्या जातील, असे सरकारने जाहीर केले आहे.
बातम्या आणखी आहेत...