आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'नो फ्लाय लिस्‍ट\'चे नवे नियम: गैरवर्तवणूक करणाऱ्या प्रवाशांवर दोन वर्षांची बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकार्‍याला मारहाण केल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयने ’नो फ्लाय लिस्ट’ बनवण्‍याच्‍या दृष्टीने काम सुरु केले आहे. शुक्रवारी नागरी उड्डाण मंत्रालयाने यासंदर्भातील नियम जाहीर केले. यामध्‍ये तीन प्रकारांत शिक्षा व गुन्‍ह्यांची वर्गवारी करण्‍यात आली आहे. 

तीन प्रकारांमध्‍ये शिक्षेची वर्गवारी 
1) पहील्‍या प्रकारात प्रवाशाने धमकी देणारे हावभाव किंवा इशारे केल्‍याचे सिध्‍द झाल्‍यास त्‍याच्‍यावर 3 महिन्‍यांची बंदी घातली जाणार आहे, असे नागरी  नागरी उड्डाण मंत्रालयचे सचिव आर. एन. चौबे यांनी सांगितले.  
 
2) दुसऱ्या प्रकारात कर्मचाऱ्याला धक्‍का देणे, लाथ मारणे, लैगिंक छळ करणे, आक्षेपार्ह हावभाव करणे अशा गुन्‍ह्यांचा समावेश करण्‍यात आला आहे. प्रवाशाने हा गुन्‍हा केल्‍याचे सिध्‍द झाल्‍यास त्‍याला 6 महिन्‍यांसाठी 'नो फ्लाय लिस्‍ट' मध्‍ये टाकण्‍यात येणार आहे. 
 
3) तिसऱ्या प्रकारात प्रवाशाच्‍या वर्तनाने कर्मचाऱ्याच्‍या जीवाला धोका निर्माण झाला तर अशा प्रवाशावर दोन वर्षांसाठी निर्बंध घालण्‍यात येणार आहे. या यादीतील प्रवाशांना बंदीच्‍या काळात एअर इंडियाच्‍या विमानातून प्रवास करता येणार नाही.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
  
 
बातम्या आणखी आहेत...