आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणतीही तरुणी बलात्काराचा खोटा आरोप करणार नाही, कोर्टाचा निर्वाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपला समाज रूढीवादी आहे. अशा समाजात एखादी युवती बलात्काराचा खोटा आरोप ठेवून स्वत:ची प्रतिष्ठा मलिन करणार नाही, अशी टिप्पणी मेहुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस ७ वर्षांची शिक्षा ठोठावताना न्यायमूर्तींनी केली. आपल्याला बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली अडकवण्यात आले आहे, असे आरोपीचे म्हणणे होते. परंतु न्यायालयाने हा आरोप फेटाळून लावला.   

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश संजीव जैन यांनी म्हटले, बलात्कार हा शारीरिक हल्ला नव्हे, तर त्यामुळे पीडितेचे जीवन उद्ध्वस्त होते.  बलात्कार असहाय्य महिलेच्या आत्म्यावर खोलवर झालेला घाव ठरतो. ही घटना पीडितेमध्ये घृणा, अपमान, दुु:ख  आणि लाजिरवाणी अवस्था निर्माण करते. चुलत बहिणीच्या पतीने २६ मार्च २०१६ रोजी  रात्री  बलात्कार केला होता, या  पीडितेच्या जबाबावर न्यायालयाने विश्वास ठेवला.  दुसऱ्यांदा असा प्रयत्न झाल्यानंतर तिने तक्रार दिली.
बातम्या आणखी आहेत...