आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात महापुरुषांच्या नावाने सुट्या बंद होणार; योगी सरकारचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- महापुरुषांच्या जयंतीदिनी उत्तर प्रदेशातील शाळांना दिल्या जाणाऱ्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुटी न देता ज्या महापुरुषाची जयंती, त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांना शिकवले जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

यापुढे शाळांना महापुरुषांच्या जयंतीदिनी सुटी नसेल. त्याऐवजी दोन तासांचा विशेष कार्यक्रम घेऊन त्या महापुरुषांविषयी शिकवले जाईल. २२० दिवसांचे शैक्षणिक सत्र सार्वजनिक सुट्यांमुळे १२० दिवसांवर आले आहे.  सार्वजनिक सुट्यांची प्रथा अशीच सुरू राहिली तर शाळेत शिकवायला दिवसच उरणार नाहीत, असे आदित्यनाथ यांनी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले. 

जयंतीच्या १७ सुट्या
उत्तर प्रदेशातील शाळांना ४२ सार्वजनिक सुट्या आहेत. त्यापैकी १७ सुट्या महापुरुषांच्या जयंतीशी संबंधित आहेत.
बातम्या आणखी आहेत...