आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Delhi Election : प्रचारातून मुद्दे हरवले, केवळ केजरीवाल विरुद्ध बेदी एवढीच चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या निवडणुकांसाठी सुरू असलेल्या प्रचारात नागरिकांच्या समस्येशी संबंधित कोणतेच मुद्दे समोर येत नसल्याचे चित्र आहे. चर्चा आहे ती केवळ केजरीवाल विरुद्ध किरण बेदी एवढीच.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या भारत दौर्‍यादरम्यान तीन दिवस ज्या दिल्लीत होते, त्याच दिल्लीत आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्लीकरांचा विचार करता या निवडणुका त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याचे कारण म्हणजे, देशाची राजधानी असूनही सध्या दिल्लीत वीज आणि पाण्याच्या समस्येने नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत.

ओबामांच्या दौर्‍यादरम्यान दिल्लीत येत्या आठ दहा दिवसांत निवडणुका होणार याचा जणून लोकांना विसरच पडला होता. त्यामुळे मग दिल्लीकरांच्या समस्येशी संबंधित मुद्यांचा कुठेही उल्लेख होणे त्याअर्थाने शक्यही नव्हते. पक्षांनीही या दौर्‍याकडे सगळ्यांचे लक्ष असल्याने प्रचारावर फार जोर दिला नाही. एवढंच काय तर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनीही ओबामांनी देशातून निरोप घेताच रोड शो काढला. म्हणजे त्यांनीही माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी आणि इतर सगळा विचार करूनच हा निर्णय घेतला.

मुद्देच हरवले
गेल्या काही दिवसांत अपवाद वगळता माध्यमांनी दिल्लीकरांची मते जाणून घेतली पण ती आगामी निवडणुकीतील मुद्यांसदर्भात नव्हे तर ओबामांच्या दौर्‍यासंदर्भात होती.

ओबामा तर पाहुणे म्हणून भारतात आले होते. त्या तीन दिवसांत नक्कीत त्यांची चर्चा होती. पण त्याआधीही दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुद्यांऐवजी अधिक चर्चा झाली ती केजरीवाल विरुद्ध किरण बेदी या लढ्याचीच.
पुढे वाचा, महत्त्वाच्या मुद्यांवर कोणीच बोलेना...