आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ पेक्षा कमी वयाची मुले नोकरी करू शकणार नाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात १४ पेक्षा कमी वयाची मुले कोणत्याही प्रकारच्या उद्योग किंवा संस्थेमध्ये नोकरी करू शकणार नाहीत. कोणतीही कंपनी अथवा संस्थामालक लहान मुलांना रोजगार देत असेल, तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. त्यांना तुरुंगाची हवाही खावी लागेल. याशिवाय मुलांना रोजगारावर पाठवणार्‍या पालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भातील विधेयकाचा मसुदा मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येईल.

सध्या बालकामगार अधिनियम १९८६ नुसार, देशात १८ धोकादायक व्यवसाय आणि ६५ कामे वगळता १४ वर्षांच्या आतील मुले रोजगारावर राहू शकतात. विशेष म्हणजे, सन २०१२ मध्ये याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर देशात कोणत्याही भागात १४ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचा मुलगा कंपनीत कर्मचारी म्हणून काम करू शकणार नाही. तसेच १४ ते १८ वर्षांची मुले धोकायदायक व्यवसायात काम करू शकणार नाहीत. मंत्रालयाच्या सन २०१३-१४ च्या अहवालानुसार २००१ च्या जनगणनेनुसार देशात पाच वर्षे ते १४ वर्षांपेक्षा कमी वयाची १.२६ कोटी मुले काम करत होते. एनएसएसओच्या सन २००९ - १० च्या सर्वेक्षणानुसार देशातील अशा मुलांची संख्या ४९.८४ लाख होती.