आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Law Bars Ashok Chavan From Contesting: Sonia Gandhi Defends Tainted Candidate

अशोकरावांवर कायदा, निवडणूक आयोगाची बंदी नाही : सोनिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आदर्श सोसायटी घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लोकसभेची निवडणूक लढवण्यास ‘आदर्श’च असल्याचा शेरा कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी दिला. जाहीरनामा अनावरण कार्यक्रमात सोनिया म्हणाल्या की, आदर्श प्रकरणात चव्हाण यांना कायद्यानुसार शिक्षा झालेली नाही. तसेच निवडणूक आयोगाने निवडणूक लढविण्यावर बंदीही घातली नाही. आदर्श प्रकरणात त्यांचे अंत:करण निर्मळ असल्याचा निर्वाळाही सोनियांनी या वेळी दिला. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी बुधवारी नांदेडमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने मंगळवारी अशोक चव्हाण यांना तिकीट जाहीर केले होते.

मी कुठे भ्रष्टाचार केला : चव्हाण
प्रश्न : भ्रष्टाचाराचा मुद्दा राहुल यांच्या अजेंड्यावर असताना तुम्हाला उमेदवारी देणे ही काँग्रेसची चूक आहे काय?
अशोक चव्हाण यांचे उत्तर
० या प्रकरणात भ्रष्टाचाराचा मुद्दा येतोच कुठे?
० येदियुरप्पांचे काय? खाण घोटाळ्यात सहभागी येड्डी व रेड्डी बंधूंविषयी भाजप स्पष्टीकरण देत का नाही?
० आदर्शच्या आरोपपत्रात माझे नाव असले तरी मला कुठे दोषी ठरवले आहे? निवडणूक बंदीही नाही.
० देशात कायदे आहेत, त्यांच्या तरतुदी आहेत. त्यात माझ्यावर कुठेही अपात्रता, बंदी घातलेली नाही.

सीबीआय हायकोर्टात
आदर्श घोटाळ्याच्या फौजदारी खटल्यातून अशोक चव्हाणांचे नाव वगळण्यास नकार देणार्‍या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सीबीआयने बुधवारी हायकोर्टात धाव घेतली आहे. चव्हाण यांचे नाव एफआयआरमधून वगळण्याबाबत सीबीआयची याचिका विशेष न्यायालयाने जानेवारीत फेटाळली होती.