आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदृढ बाळासाठी गरोदर स्त्रियांनी मांसाहार, सेक्स करू नये; केंद्रीय आयुष मंत्रालय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नवी दिल्ली - केंद्रीय आयुष मंत्रालयाने सुदृढ बाळ मिळवण्यासाठी गरोदर स्त्रियांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत एक माहिती पुस्तिका प्रकाशित केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या या पुस्तिकेत गरोदर महिलांना अजब सल्ले देण्यात आले आहेत. त्यामध्ये गर्भवती स्त्रियांनी मांसाहार करू नये, सेक्स करू नये, वाईट लोकांच्या संगती राहू नये असे म्हटले आहे. यासोबतच, नेहमी धार्मिक आणि चांगले विचार मनात ठेवून आपल्या खोलीत चांगल्या आणि सुंदर बाळाचे चित्र लावा असे सल्ले सुद्धा पीएम मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने दिले आहेत. 
 
केंद्राकडून अनुदानित केंद्रीय योगा आणि निसर्गोपचार संशोधन समितीच्या संकेतस्थळावर हे सल्ले सार्वजनिक करण्यात आले आहेत. यात भारताच्या प्राचीन आरोग्य उपचाराला शतकांचा इतिहास आहे असे ब्रिदवाक्य ठेवून माहिती पुस्तिकेतील सल्ले देण्यात आले आहेत. या पुस्तिकेचे प्रकाशन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पार पडले होते. 21 जुलै रोजी पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी सध्या केंद्राकडून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे सल्ले दिले जात आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...