आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Medicine To Indian For Cancer, German Company Byer CEO Unhappy

कॅन्सरचे ‘ते’ औषध भारतीयांसाठी नाही,जर्मन कंपनी बायरच्या सीईओचे उद्दाम वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बायर फार्माने कॅन्सरवरील औषधाची निर्मिती भारतीयांसाठी नव्हे तर ते खरेदी करण्याची क्षमता असलेल्या पाश्चिमात्य ग्राहकांसाठी केली होती, असे वक्तव्य जर्मनीच्या या औषध कंपनीचे सीईओ मारिजिन डेक्करर्स यांनी केले आहे.
गेल्या महिन्यात एका परिषदेत त्यांनी केलेले हे वक्तव्य बिझनेस विकमध्ये प्रसिद्ध करण्यात आले असून आंतरराष्‍ट्रीय स्तरावर या वक्तव्याचा निषेध होत आहे.
कारण काय? : बायर फार्मा पेटंट अधिकारात ज्या ‘नेक्झावर’ औषधाची निर्मिती करते त्याचे जेनेरिक स्वरूप तयार करण्याची परवानगी भारताने हैदराबादच्या नॅटको फार्माला दिली आहे. त्यामुळे सुमारे 2.84 लाख रुपयांचे हे औषध (120 गोळ्या) अवघ्या 8,880 रुपयांना मिळू शकेल. बायर कंपनीला आर्थिकदृष्ट्या याचा मोठा फटका बसणार आहे.