आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Modi Wave, Only A BJP Wave: Murli Manohar Joshi News In Divya Marathi

देशात मोदींची नव्हे, भाजपची लाट; मोदी तर फक्त पीएमपदाचे उमेदवार : जोशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नरेंद्र मोदींसाठी वाराणसीची जागा सोडणारे मुरली मनोहर जोशी यांनी अखेर मौन सोडले. देशात मोदींची नव्हे, भाजपची लाट असल्याचे सांगून मोदी फक्त पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या रूपात भाजपचे प्रतिनिधी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीवर मुलाखतीत जोशी म्हणाले, भाजपच्या पीएमपदाच्या उमेदवाराला पक्षासोबत चांगला पाठिंबा मिळत आहे. ही लाट व्यक्तीची नव्हे, पक्ष प्रतिनिधीची लाट आहे. सत्ता आल्यावर देशभर गुजरात मॉडेल लागू करण्याबाबत जोशी म्हणाले, ‘कोणत्याही एका राज्याचे मॉडेल मान्य नाही. सर्वच राज्यांतील विकास कल्पना स्वीकाराव्यात. एखादे मॉडेल काश्मीर, अरुणाचलात लागू होत असेल तर केरळमध्ये लागू होईल असे नाही. कदाचित तिथे (गुजरातमध्ये) काही चांगल्या गोष्टी असतील. अशाच काही त्रिपुरातून घ्याव्या लागतील. तेव्हाच विकासाचे मॉडेल तयार होईल.’ जोशींच्या वक्तव्यावर पक्षप्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

जसवंत यांचा मुद्दा
जसवंतसिंह पक्षाचे मोठे नेते होते. त्यांच्याबाबतीत चुकीचे झाले. त्यांना तिकीट नाकारण्याचा निर्णय निवडणूक समिती नव्हे, वसुंधरा राजे आणि राजनाथ यांचा होता. - मुरली मनोहर जोशी

पुढे वाचा अडवाणी मात्र खुश..!