आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीआेके भारताचेच, व्हिसासाठी पाकच्या परवानगीची गरज नाही : स्वराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना व्हिसासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांच्या पत्राची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दांत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देशाची भूमिका मांडली.

पीआेकेच्या रावळकोटचा रहिवासी असलेल्या आेस्मा अली (२४) यास यकृतावरील उपचारासाठी दिल्लीला येण्याची इच्छा आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वराज यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पीआेके हा भारताचा भाग आहे. आम्ही आेस्माला व्हिसा देऊ. त्यासाठी अझीझ यांच्या पत्राची गरज नाही, असे स्वराज यांनी ट्विट करून सांगितले. तत्पूर्वी अलीच्या कुटुंबियांनी स्वराज यांना त्याबाबत विनंती केली होती. मुलासाठी वैद्यकीय व्हिसाची सोय उपलब्ध करून देण्याची विनंती अलीच्या कुटुंबियाकडून करण्यात आली होती.
 
 कुलभूषण जाधव यांच्या आईने व्हिसासाठी पत्र पाठवले होते. पाकिस्तानने या प्रकरणात दुर्लक्ष केले आहे. त्यावरून ते संवेदनशील नसल्याचे दिसून येते. मात्र पाकिस्तानातून एखादा व्यक्ती उपचारासाठी भारतात येणार असल्यास त्याला तत्काळ प्रवेश देण्याची व्यवस्था केली जाईल, असे स्वराज यांनी १० जुलै रोजी सांगितले होते. स्वराज यांनी अनेक ट्विट करून पाकिस्तानी नागरिकांबद्दलचा सहानुभूती देखील व्यक्त केली होती. पाकिस्तानमध्ये अवंतिका जाधव हिचा व्हिसा अर्जही धूळखात पडला आहे. त्याकडेही पाकिस्तानने दुर्लक्ष केले आहे, याकडेही सुषमा यांनी लक्ष वेधले होते.

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री ज्युलिया बिशॉप यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. मंगळवारी बिशॉप यांनी सुषमा स्वराज यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. उभय देशांत संरक्षण, सुरक्षा, व्यापारातील सहकार्य वृद्धीसाठी प्रयत्न करण्यावर सहमती व्यक्त करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...