आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NGT चा आदेश : दिल्लीत नाही होऊ शकणार डिझेल गाड्यांचे रजिस्ट्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) म्हटले आहे, दिल्लीमध्ये कोणत्याही डिझेल गाड्यांची नोंदणी होऊ शकणार नाही. एनजीटीने केंद्र आणि राज्य सरकारला देखिल आदेश दिला आहे की त्यांनी त्यांच्या विभागांसाठी डिझेल गाडी खरेदी करु नये.

एनजीटीचे सम-विषम क्रमांकाच्या फॉर्म्यूल्यावर प्रश्नचिन्ह
दिल्लीमध्ये सम-विषम तारखेला रस्त्यावर गाडी चालवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. एनजीटीचे म्हणणे आहे, की हा निर्णय यशस्वी होऊ शकत नाही. याने प्रदुषण कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. तसेच एनजीटीचे म्हणणे आहे, की या नियमामुळे नागरिकांना दोन गाड्या खरेदी कराव्या लागतील.
बातम्या आणखी आहेत...