आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No News Report Of Swatantrakumar, Delhi High Court Decision

स्वतंत्रकुमार यांच्या बातम्यांवर निर्बंध,दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांना दिलासा दिला आहे. एका महिला प्रशिक्षणार्थी वकिलाचा विनयभंगाचा आरोप आहे, परंतु आरोपाचे प्रकाशन आणि प्रसारणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तशी विनंती स्वतंत्रकुमार यांच्याकडून करण्यात आली होती. केवळ कोर्टातील कार्यवाही प्रकाशित करता येणार आहे.
दोन इंग्रजी वृत्तवाहिन्या आणि एका इंग्लिश वृत्तपत्राला न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. संकेतस्थळावरील आरोप 24 तासांत हटवण्याचे निर्देशही कोर्टाने बजावले आहेत. त्याशिवाय स्वतंत्रकुमार यांनी या वृत्तपत्राच्या विरोधात मानहानीचा दावादेखील दाखल केला आहे. पुढील काळात प्रकाशित करण्यात येणा-या वृत्तामध्ये कुमार यांचे छायाचित्र वापरले जाऊ नये, अशी तंबी न्यायालयाने दिली आहे. 24 फेब्रुवारीपर्यंत अर्थात पुढील सुनावणीपर्यंत लागू राहील. कोर्टाने लॉ इंटर्नसह सर्व पक्षांना नोटीस पाठवली आहे.