आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॉप सभेमुळे कॉंग्रेसच्‍याच उमेदवारांना राहुल गांधी झाले नकोसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीच्‍या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची स्थिती बिकट झाल्‍याचे चित्र निर्माण झाले आहे. कॉंग्रेसचे युवराज उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांच्‍या सभेला अतिशय कमी गर्दी झली. रिकाम्‍या खुर्च्‍यांचेच सर्वत्र दर्शन होत होते. एवढेच नव्‍हे तर राहुल गांधींचे भाषण सुरु होण्‍यापूर्वीच लोक उठून निघू लागले. राहुल गांधींच्‍या या फ्लॉप सभेमुळे कॉंग्रेसच्‍या उमेदवारांना प्रचारासाठी ते आता नकोसे झाले आहेत.

आपल्‍या मतदारसंघात कोणत्‍याही मोठ्या नेत्‍याची प्रचार सभा ठेवू नका, अशी प्रार्थना कॉंग्रेसचे उमेदवार हायकमांडला करु लागले आहेत. दक्षिणपुरी येथील सभेप्रमाणे आपल्‍या मतदारसंघातील सभेतूनही लोक पळून तर जाणार नाहीत ना, अशी भीती त्‍यांना सतावत आहे. दक्षिणपूरी येथील आंबेडकरनगर भागात राहुल गांधींच्‍या सभेतून लोक उठून गेले होते. राहुल गांधी खूप उशीरा आले. ते आले तेव्‍हा लोक निघू लागले. मुख्‍यमंत्री शीला दीक्षित यांच्‍या आवाहनानंतरही लोक थांबले नाही.

राहुल गांधी यांच्‍या उपस्थितीत झालेल्‍या सभेचे हे चित्र पाहून कॉंग्रेसचेही धाबे दणाणले आहे. आणखी एक-दोनदा असे झाल्‍यास नरेंद्र मोदींपुढे राहुल गांधींचा टीकाव लागणार नाही, अशी भीती कॉंग्रेसच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांमध्‍ये निर्माण झाली आहे.


काय झाले राहुल गांधींच्‍या सभेत? वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..