आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सास-याच्या संपत्तीवर सुनेचा हक्क नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पतीच्या संपत्तीवर पत्नीचाही अधिकार आहे, मात्र आपल्या सासू-सास-याच्या घरात राहण्यासाठी ती दावा करू शकत नाही. दिल्लीच्या न्यायालयाने आपल्या निकालात ही बाब स्पष्ट केली आहे.
सासूच्या घरात राहण्यासाठी अधिकार मागणा-या एका डॉक्टर महिलेची याचिका खारीज करताना न्यायालयाने हे मत नोंदवले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कामिनी लॉ यांनी म्हटले आहे की, पत्नीला पतीच्या संपत्तीवर हक्क सांगता येऊ शकतो, परंतु सासू-सास-याच्या संपत्तीवर मात्र ती कोणत्याही प्रकारे हक्क सांगू शकत नाही. त्यांच्या इच्छेशिवाय ती तेथे राहूदेखील शकत नाही.