आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुण जेटलींनी पक्षशिस्तीला ढाल बनवू नये : कीर्ती आझाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी पक्षाच्या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर दिले आहे. त्यात आझाद यांनी डीडीसीए (दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन) घोटाळ्याचा आरोप असलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांना पुन्हा लक्ष्य केले आहे. डीडीसीए आणि भाजपचा काही संबंध नाही. जेटलींनी पक्ष शिस्तीला ढाल बनवू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपने गुरुवारी त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्याला उत्तर देताना शुक्रवारी त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेचे व्हिडिआेसह चार अन्य चित्रफिती पक्षाला पाठवल्या आहेत. त्यासोबत काही दस्तऐवजही जोडले आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून हा मुद्दा मी उचलत आहे. त्यावर पक्षाकडून एकदाही मनाई करण्यात आली नाही. पक्षाला जनाधार नव्हता. तेव्हा म्हणजे १९९३ मध्ये पक्षात दाखल झालाे होतो. या २२ वर्षांत एकनिष्ठ सैनिक म्हणून पक्षाचे काम केले. माझे यश आणि आेळख भाजपमुळे आहे. पक्षाच्या नेतृत्वाने माझ्या विरोधातील प्रस्तावित शिस्तभंगाची कारवाई रद्द करावी. जेणेकरून भाजपचा खासदार म्हणून गर्वाने पुन्हा काम करू शकेल, असे आझाद म्हणाले.

पक्षाच्या सर्वा प्रश्नांना सविस्तर उत्तरे
पक्षाने जेटलींची डीडीसीएवर नियुक्ती केली नव्हती; परंतु आता घोटाळा समोर येताच अधिकाराचा वापर करून स्वत:चा बचाव करणे योग्य होणार नाही. पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये, यावर आझाद यांनी हे उत्तर दिले. अमित शहा, राम लाल यांनी गप्प बसण्याचा सल्ला दिला होता. परंतु भ्रष्टाचाराचे पुरावे देण्यास तयार असतानाही त्यांनी जेटलींसोबत बैठक घेतली नाही. पक्षाला बदनाम का केले? यावर त्यांनी सांगितले, मी कधीही व्यक्ती किंवा पक्षाचे नाव घेतले नाही. काँग्रेसच्या सांगण्यावरून कधीही मुद्दा मांडला नाही. पक्षाला कधीही बदनाम केले नाही, असे दावे आझाद यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...