आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेट परीक्षेसाठी बूट, बेल्ट, फुल शर्ट बंदी - ड्रेस कोड लागू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीएसईने एआयपीएमटीपासून धडा घेत राष्ट्रीय ‘नेट’साठीही ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता उमेदवार बूट आणि पूर्ण बाह्यांचा शर्ट घालून परीक्षा देऊ शकणार नाहीत. केंद्रात घेऊन जाण्यास बंदी असणाऱ्या वस्तूंची यादीही जारी करण्यात आली आहे. नेट परीक्षा २७ डिसेंबरला होत आहे. उमेदवार परीक्षेत घड्याळ आणि बेल्ट बांधून जाता येणार नाही. तसेच पेन आणि पर्सही सोबत बाळगता येणार नाहीत. पाण्याची बाटलीही नेण्याची परवानगी नसेल. उमेदवारांना बूट घालून जाता येणार नाही, फक्त चप्पलच घालावी लागेल. मात्र, सँडल घालण्याची परवानगी असेल.

या वस्तूंवर बंदी: पर्स, गॉगल, हँडबॅग, गंडा, बेल्ट, टोपी, स्कार्फ, कागदाचे तुकडे, पेन्सिल बॉक्स, प्लीस्टिकची पिशवी, पेन ड्राइव्ह, कॅलक्युलेटर, मोबाइल, इयरफोन, हेल्थ बँडस घड्याळ, बांगड्या, झुमके, नथ, साखळी किंवा हार, साडीची पिन.
बातम्या आणखी आहेत...