आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी मुख्यमंत्र्यांची एसआयटी चौकशी नाही, सुप्रीम कोर्टाचा आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सहारा आणि बिर्ला समूहावर प्राप्तिकर खात्याने टाकलेल्या छाप्यांच्या वेळी जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्याच्या विरोधात एसआयटी चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

न्यायालयाने याचिकाकर्ते ‘कॉमन कॉज’ला म्हटले आहे की, तुम्ही ज्या तथ्यांच्या आधारावर चौकशीची मागणी करत आहात, ते पुरेसे नाहीत. तुम्ही न्यायालयासमोर ठोस पुरावे ठेवले तर तुमच्या मागणीवर विचार केला जाऊ शकतो. ‘कॉमन कॉज’ने म्हटले होते की, २०१३-१४ मधील प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात जप्त केलेल्या कागदपत्रांत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री (नरेंद्र मोदी) यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा उल्लेख आहे. त्यांना िनधी देण्यात आला आहे. त्यामुळे या कागदपत्रांची एसआयटीद्वारे चौकशी केली जावी. न्यायमूर्ती जे. एस. केहर आणि अरुण मिश्रांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, फक्त संगणकीकृत नोंदीच्या आधारावर कोणाच्याही विरोधात कारवाई केली जाऊ शकत नाही.
बातम्या आणखी आहेत...