आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Sri Lankan Players In IPL, Jayalalithaa Writes To PM

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL मध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंना बंदी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई / नवी दिल्ली - श्रीलंकेतील तामिळींच्या कथित संहाराच्या मुद्यावर सुरू असलेल्या राजकाराणाचा फटका क्रिकेट प्रेमींना बसत आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंना भारतात खेळण्यास विरोध केला आहे. जयललिता यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहून हा विरोध दर्शवला आहे.

जयललिता यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चेन्नई मध्ये होणा-या आयपीएल सामन्यात श्रीलंकेचे खेळाडू, पंच आणि श्रीलंकेचे अधिकारी नसतील असे आयोजकांनी लिखित स्वरुपात आश्वासन दिले तरच चेन्नईमध्ये सामने खेळू दिले जातील. एप्रिल महिन्यात आयपीएलच्या सहाव्या सीझनला सुरूवात होणार आहे.