आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांच्या पक्षीय आंदोलनाला पाठिंबा नाही : अण्णा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - नवी दिल्लीत 23 मार्चपासून सुरू होणार्‍या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षीय आंदोलनास पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट करतानाच महागाईच्या मुद्यावर होणार्‍या आंदोलनास आपला आशीर्वाद असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी सांगितले.

दरम्यान, आपण हे आंदोलन राजकीय बॅनरखाली करणार नसल्याचे सांगत हजारे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. आम आदमी पार्टी स्थापनेनंतर केजरीवाल प्रथमच राळेगणसिद्धीस अण्णांच्या भेटीसाठी आले. दीड तास बंद खोलीत त्यांची चर्चा झाली. नंतर अण्णा व केजरीवाल यांनी भूमिका मांडली.