आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Tax Evasion Angle To Probe In Niira Radia Tapes News In Marathi

राडिया टेप प्रकरण करचोरीत मोडत नाही : आयकर विभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कॉर्पोरेट लॉबिस्ट राडिया टेप प्रकरण करचोरीत मोडत नसल्याचे आयकर विभागाच्या चौकशीत आढळून आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर आयकर विभागाने टूजी स्पेक्ट्रम प्रकरणी राडियाच्या ध्वनिमुद्रित टेप्सच्या चौकशीचे निर्देश दिले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने राडिया टेपबाबत सर्वोच्च न्यायालयात सविस्तर अहवाल दाखल केला आहे. न्यायालय पुढील महिन्यात याचा सुनावणीत समावेश करू शकते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावर ध्वनिमुद्रित टेप्सच्या माध्यमातून करचोरीची चौकशी सुरू केली होती. आयकर विभागाची विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, तपासामध्ये असा कोणताही पुरावा आढळून आला नाही.

एसएफआयओच्या हालचाली सुरू : सीबीआय कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांना क्लीन चिट देण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्यांच्या अडचणी संपत नाहीत. सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने (एसएफआयओ) राडियाची कंपनी वैष्णवी फिल्मविरुद्ध खटला दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रकरण कंपनी कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित आहे. एसएफओने नुकतीच वैष्णवी फिल्मविरुद्ध चौकशी पूर्ण केली आहे.

परवानगी मिळाल्यानंतर खटला चालवता यावा यासाठी चौकशी अहवाल कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे पाठवला होता. मंत्रालयाकडून ही परवानगी मिळाली आहे.

कंपनीने चौकशी अहवाल मागवला
वैष्णवी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सने रविवारी कंपनी प्रकरणांचे मंत्री सचिन पायलट यांना लिहिलेल्या पत्रात चौकशी अहवालाची एक प्रत मागितली आहे. याबरोबर आवश्यकता भासल्यास कंपनीने सरकारला या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यावे, असे म्हटले आहे. चौकशीत योग्य मार्गाचा अवलंब झाला की नाही हे त्यात हस्तक्षेप करून जाणून घ्यावे, अशी विचारणा कंपनीने पायलट यांच्याकडे केली आहे.