आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता वेटींग तिकीटावरील प्रवास विसरा, भरावा लागेल दुप्पट दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वे मंत्रालय एकीकडे प्रवाशांच्या सोयीसाठी एक पाऊल पुढे टाकत आहे तर दुसरीकडे त्यांच्या संकटात वाढ करणारे निर्णय घेत आहे.

रेल्वेने एसएमएस सुविधेद्वारा तिकीट काढण्याची प्रवाशांच्या सोयीची योजना सुरु केली आहे. तर, आता वेटींग (प्रतिक्षा यादी) तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार आता वेटींग तिकीटावर प्रवास करता येणार नाही. असे केल्यास प्रवाशांना कोणत्याही स्टेशनवर उतरवून दिले जाईल. एवढेच नाही तर दुप्पट दंड वसूल केला जाण्याची शक्यता आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ई- तिकीट वेटींग असेल तर त्या तिकीटावरील प्रवासाला यापूर्वी मान्यता नव्हती. मात्र, रेल्वेच्या तिकीट आरक्षण केंद्रावरून मिळालेले तिकीट जर वेटींग असेल तर त्या तिकीटावर प्रवास करता येत होता. आता कोणत्याही वेटींग तिकीटावर प्रवास करणे दंडनीय अपराध ठरणार आहे.