आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बुरे दिन' : लोकसभेत एकेकाळच्या सहका-यांनाच नकोसा झाला काँग्रेसचा 'शेजार'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दोन महिन्यांपूर्वी सत्तेत असणा-या काँग्रेसबरोबर आता लोकसभेतील विरोधी पक्षाच्या बाकांवर बसण्यासही कोणी तयार होत नसल्यची परिस्थिती निर्माण झाली आहे. 37 खासदार असलेला एआयएडीएमके, 34 खासदार असलेला तृणमूल काँग्रेस आणि 20 खासदार असलेला बीजू जनता दल या सर्वच पक्षांनी काँग्रेसबरोबर बसण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे एकेकाळी सहकारी असलेले पक्षही काँग्रेसबरोबर बसण्यास तयार नाही. त्यामुळेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांनीही खासदारांच्या बसण्याची जागा म्हणजेच डिव्हीजन नंबर अद्याप ठरलेला नाही. सध्या केवळ पहिल्या रांगेतील नेत्यांच्या जागेबाबत निर्णय झाला आहे. त्यातही काँग्रेसला चार जागा हव्या होत्या, पण त्यांना तिथेही दोनच जागा मिळाल्या.
लोकसभेत पक्षांच्या संख्याबळाच्या आधारावर आणि सरकाच्या मतानुसार पक्षानुसार खासदारांच्या बसण्याची जागा ठरते. पहिल्या रांगेतील सहा जागांसह डावीकडे असलेल्या पहिल्या ब्लॉकमध्ये विरोधकांसाठी 95 जागा असतात. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रसेचे केवळ 44 खासदार आहे. त्यामुळे उर्वरित जागांवर विरोधकांमधील इतर पक्षातील खासदारांना बसावे लागणार आहे.
युपीएचे एकूण 59 खासदार आहेत. त्यामुळे युपीएशिवाय केवळ तृणमूलचे 34 खासदारच पहिल्या ब्लॉकमध्ये बसू शकतील. पण राज्यात ते काँग्रेसचे विरोधक आहेत. त्यामुळे लोकसभेत तृणमूलला काँग्रेसबरोबर बसण्याची इच्छा नाही. तीच परिस्थितीती बीजदचीही आहे. या पक्षांच्या नेत्यांनी त्यांना बसण्यासाठी दुस-या ब्लॉकमधअये स्थान देण्याची मागणी केली आहे. बीजद खासदारांच्या मते ते चौथ्या क्रमांकाच्या विरोधी पक्षातील आहेत, त्यामुळे त्यांना काँग्रेसबरोबर पहिल्या ब्लॉकमध्ये बसवणे योग्य ठरणार नाही.
फाइल फोटो-सोनिया गांधी
पुढे वाचा..सभापती कसा घेतील निर्णय