आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Reality Check Of 2000 Rs Note Ban After Launch Of 200 Rs Note By RBI Modi Government

#NoFakeNews: सप्टेंबरमध्ये 200 रुपयांची नोट लॉन्च होताच बंद होणार 2000 ची नोट?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 200 रुपयांची नोट बाजारात येणार असल्याच्या बातमी पाठोपाठ सप्टेंबरपासून 2000 रुपयांची नोट चलनातून बंद होणार असल्याचे मेसेज इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमागचे सत्य काय आहे त्याची पडताळणी divyamarathi.com ने केली आहे.
 
काय आहे व्हायरल मेसेजमध्ये ?
- व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी आज घोषणा केली आहे की सप्टेंबरपासून देशात 2000 रुपयांची नोट बंद होणार आहे. त्याऐवजी RBI 200 रुपयांची नोट जारी करणार आहे. 
 
आमच्या तपासणीत सापडेल हे सत्य
- व्हायरल मेसेजमध्ये दावा केला आहे की अर्थमंत्री जेटलींनी 2000 रुपयांची नोट सप्टेंबरपासून बंद होणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी आम्ही अर्थमंत्रालय आणि RBI च्या अधिकृत वेबसाइट सर्च केल्या. बराच धांडोळा घेतल्यानंतरही अशी कोणतीच माहिती तिथे सापडली नाही. 
- आमच्या तपासणीत आम्हाला केंद्र सरकारची अधिकृत वेबसाइट PIB च्या ट्विटर हँडलवर अर्थमंत्री जेटलींशी संबंधीत एक ट्विट सापडले. 23 ऑगस्टच्या या ट्विटमध्ये अर्थमंत्र्यांनी 2000 रुपयांची नोट बंद न करण्याचे म्हटले होते. 
- आरबीआयच्या एका अधिकाऱ्याने divyamarathi.com ला सांगितले की RBI ला 200 रुपयांची नोट छापण्याची मंजूरी मिळाली आहे, मात्र या नोटेच्या आगमनानंतर 2000 रुपयांची नोट बंद होणार नाही. 2000 रुपयांची नोटही चलना राहाणार आहे. 
 
पडताळणीतील सत्य 
- व्हायरल मेसेजचे सत्य हे आहे की 200 रुपायंची नोट येणार हे खरे आहे, मात्र  सप्टेंबरपासून 2000 रुपयांची नोट बंद होण्याची माहिती सपशेल खोटी आहे.
बातम्या आणखी आहेत...