आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#NoFakeNews: देशात 29 नाही आता 30 राज्ये, मोदी कॅबिनेटने दिली मंजूरी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारचे अनेक निर्णय हे अनेकदा सोशल मीडियावरुन जनतेपर्यंत पोहोचतात आणि त्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु होते. असाच एक मेसेज सध्या इंटरनेटवर फिरत आहे. केंद्र सरकारने गोरखालँडला देशाचे 30वे राज्य घोषित केले आहे. लवकरच पश्चिम बंगालमधून वेगळे होऊन गोरखालँड हे नवे राज्य अस्तित्वात येणार आहे. मोदी लवकरच दार्जिलिंगला येऊन स्वतः याची घोषणा करणार आहेत. या मेसेजची सत्यता divyamarathi.com ने पडताळून पाहिली आहे.
 
काय आहे व्हायरल मेसेजमध्ये...
- व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे, की मोदींच्या नेतृत्वात काल झालेल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये गोरखालँड हे आता भारताचे 30वे राज्य करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे... संसदेच्या आगामी अधिवेशनात त्याचे विधेयक सादर केले जाईल... त्याला मंजूरी मिळताच गोरखालँड हे पश्चिम बंगालमधून विभक्त होऊन नवे राज्य म्हणून ओळखले जाईल. त्यानंतर मोदी स्वतः दार्जिलिंगला येऊन याची घोषणा करतील. मोदीजी तुम्हाला शतशः धन्यवाद...
- अशाच आणखी एका मेसेजमध्ये म्हटले आहे, की गोरखालँड नवे राज्य करण्याची मोदींनी घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांना यासंबंधीची तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. गृहमंत्र्यांनी गोरखालँडच्या सर्व नेत्यांना दिल्लीला बोलावले आहे. मोदी पुढील महिन्यात या नव्या राज्याची घोषणा करणार आहेत. 
 
आमच्या पडताळणीत समोर आले हे सत्य 
- व्हायरल मेसेजमध्ये केंद्रीय कॅबिनेट मिटिंगचा हवाला दिला जात असल्यामुळे आम्ही केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरील कॅबिनेट मिटिंगसंबंधीची माहिती तपासली. या सर्चिंगमध्ये आम्हाला कुठेही गोरखालँड भारताचे 30वे राज्य होणार असल्याचा प्रस्ताव किंवा त्याला मंजूरीचा निर्णय सापडला नाही. 
- अधिक तपास केल्यानंतर जून 2017 मधील एक लेख सापडला. या लेखात भारतीय जनता पक्षाचे महासचिव आणि पश्चिम बंगलाचे प्रभारी यांचे एक वक्तव्य होते. त्यांनी म्हटल्यानुसार, भाजप गोरखालँडला वेगळे राज्य करण्याच्या बाजूने नाही. भाजपचा अशा प्रस्तावाला पाठिंबा देखील नाही.
 
काय आहे सत्य 
- मोदींच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एकाही बैठकीत गोरखालँड हे देशाचे 30वे राज्य करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्याचा उल्लेख नाही. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात गोरखालँड संबंधी ना कोणते विधेयक आले आहे. गोरखालँड अजूनही पश्चिम बंगलाचाच भाग आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हायरल मेसेज...
बातम्या आणखी आहेत...