आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Reality Check Of Airtel 2500 Rs 4G Phone Launch This Diwali To Compete Reliance Jio 4G Phone

#NoFakeNews: एअरटेल दिवाळीत आणणार 2500 रुपयांत 4G स्मार्टफोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरटेल 2500 हजार रुपयांमध्ये 4जी स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. - Divya Marathi
एअरटेल 2500 हजार रुपयांमध्ये 4जी स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - इंटरनेटवर एक मेसेज व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की जियोला टक्कर देण्यासाठी एअरटेल यंदा दिवाळीत 2500 रुपयांमध्ये 4जी स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनची बुकिंग दसऱ्यापासून होणार आहे. एअरटेल या फोनमध्ये जिओपेक्षा जास्त फिचर देणार असल्याचे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. 
 
काय आहे व्हायरल मेसेजमध्ये 
- व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे, 'देशातील सर्वातमोठी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी एअरटेल दिवाळीमध्ये 4जी स्मार्टपोन लॉन्च करणार आहे. या फोनची किंमत 2500 रुपये असेल. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल हा फोन लॉन्च करत आहे.'
- यासंबंधीच्या दुसऱ्या मेसेजमध्ये म्हटले आहे की दिवाळीमध्ये एअरटेल 2500 रुपये किंमतीचा 4जी स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. दसऱ्यापासून या फोनची बुकिंग सुरु होईल. आता डिजिटल इंडियामध्ये ग्राहकांची चांदीच चांदी आहे.

DivyaMarathi.com पडताळणी
- स्वस्त 4जी स्मार्टफोनचा मेसेज एअरटेलच्या हवाल्याने देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती आहे का, याची पडताळणी केली. बरीच शोधाशोध केल्यानंतरही आम्हाला 2500 रुपयांत 4जी स्मार्टफोनची माहिती मिळाली नाही. 
- मेसेज वेगाने पसरत असल्याने आणि ग्राहकांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण असल्याने आम्ही आमचा शोध अधिक वाढवला. त्यासाठी एअरटेलचे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेड पुनित गुप्ता यांच्याशी बातचीत केली. पुनित यांनी सांगितले, 'व्हायरल मेसेजमध्ये केला जाणारा दावा सपशेल खोटा आहे. एअरटेल असा कोणताही फोन लॉन्च करण्याची तयारी करत नाही. टाइम्स ग्रुपने यासंबंधीचे खोटे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर एअरटेल 2500 रुपयांमध्ये 4जी स्मार्टफोन देणार असल्याची बातमी पसरली.'
- पुनित यांनी सांगितल्यानुसार, एअरटेलने याआधी अनेक हँडसेट कंपन्यांसोबत टायअप केले होते, यापुढेही करत राहील. मात्र दिवाळीमध्ये 2500 रुपयांचा स्मार्टफोन सादर करण्याचा कंपनीचा कोणताही प्लॅन नाही. 
 
पडताळणीतील सत्य काय 
- DivyaMarathi.com ने केलेल्या पडताळणीत एअरटेल दिवाळीत 2500 रुपयांचा कोणताही स्मार्टफोन लॉन्च करणार नाही हे समोर आले आहे. नाही कंपनीचा तसा काही प्लॅन आहे. 
बातम्या आणखी आहेत...