आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Noida 40 storeyed Towers May Be Razed News In Marathi

नोएडात दोन 40 मजली इमारती पाडण्याचा आदेश, गार्डनच्या जागी बांधल्या इमारती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा- बांधकामाचे नियम धाब्यावर बसवून गार्डनसाठी दाखविण्यात आलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या दोन 40 मजली इमारती पाडण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. या इमारतींमध्ये सदनिका आरक्षित केलेल्या ग्राहकांना त्यांचे पैसे 14 टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
नोएडातील प्रसिद्ध इमिरल्ड कोर्ट निवासी प्रकल्पात या दोन इमारती असून त्यात एकूण 857 सदनिका आहेत. यापैकी 627 सदनिका ग्राहकांनी आरक्षित केल्या आहेत. नोएडाच्या सेक्टर 93-a परिसरात या इमारती आहेत. तीन महिन्यांच्या आत या इमारती पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून सदनिका आरक्षित केलेल्या ग्राहकांना आरक्षणाची रक्कम 14 टक्के व्याजाने परत करण्यासही सांगितले आहे. परवानगी न घेता सुपरटेक या गृहनिर्माण कंपनीला इमारती बांधण्याची परवानगी देणाऱ्या नोएडाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.
2006 मध्ये नोएडाच्या प्रशासनाने सुपरटेक या कंपनीला 14 अकरा मजली इमारती बांधण्याची परवानगी दिली होती. यात सुमारे 500 सदनिका होत्या. त्यानंतर 2009 मध्ये सुपरटेकने आणखी तीन इमारती बांधण्यास सुरवात केली. गार्डन आणि लहान मुलांना खेळण्यासाठी दाखविण्यात आलेल्या जागेवर या नवीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यावर आधीच्या इमारतींमधील रहिवाशांनी हरकत घेतली आणि न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने नवीन बांधण्यात आलेल्या दोन्ही इमारती पाडण्याचा आदेश दिला आहे.