आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेराहून काहीच आणले नव्हते, मग एवढी संपत्ती कशी? मनेकांचा सोनियांना सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजप नेत्या आणि पिलीभीत मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवार मनेका गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संपत्तीवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. शुक्रवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यानंतर सोनिया गांधी यांच्यावर संपत्तीवरुन हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, काँग्रेस अध्यक्षा लग्न करुन भारतात आल्या तेव्हा येथील जनतेने त्यांना मोठ्या मनाने आणि प्रेमाने स्विकारले. मात्र, आज परदेशातील माध्यमांनुसार जगातील श्रीमंत नेत्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक सहावा आहे. त्यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली? एवढ्यावरच मनेका थांबल्या नाही, त्या पुढे म्हणाल्या, लग्न करुन त्या (सोनिया गांधी) जेव्हा आल्या तेव्हा हुंड्यात काहीच आणले नव्हते. मग, त्यांच्याकडे एवढा पैसा कसा आला? असा सवाल उपस्थित करत त्या म्हणाल्या, तो आपला आहे. तुमच्या-आमच्या मुलांच्याची ती ठेव आहे. जो येथील रस्ते, शाळा, वीज यासाठी वापरला पाहिजे होता, तो त्यांनी जमा करुन ठेवला आहे.
विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात काँग्रेसचे नंदन निलेकणी आणि कमलनाथ, भाजपचे हर्षवर्धन आणि शत्रुघ्न व आपच्या गुल पनाग आणि शाजिया इल्मी, दिल्लीतील चांदनी चौक मतदारसंघातून अशुतोष यांचा समावेश आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली.
संदीप दीक्षित यांच्या संपत्तीमध्ये 2009 च्या तुलनेत चार पटींनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची संपत्ती सुमारे दीड कोटी रुपये होती. मीरा कुमारने पाच वर्षांत सोने खरेदी नाही; परंतु संपत्ती साडेतीन पटीने वाढली.
मीरा कुमार (काँग्रेस, सासाराम)-36 कोटी
मनेका गांधी (भाजप, पिलीभीत)-45 कोटी
किरण खेर (भाजप, चंदिगड)- 12.34 कोटी.
संदीप दीक्षित (काँग्रेस, पूर्व दिल्ली)- 7.35 कोटी.
व्ही.के. सिंह (भाजप, गाझियाबाद)-4.12 कोटी
हर्षवर्धन (भाजप, चांदनी चौक)-12.37 कोटी.
आशुतोष (आप, चांदनी चौक)- 4.68 कोटी.
नवीन जिंदल (काँग्रेस, कुरुक्षेत्र) 297 कोटी
श्रुति चौधरी (काँग्रेस, भिवानी-महेंद्रगड) 11.95 कोटी
गुल पनाग (आप, चंडीगड) 5.00 कोटी
व्ही.के. सिंह (भाजप, गाझियाबाद) 4.12 कोटी

पुढील स्लाइडमध्ये, दलित नेते उदित राज यांच्याकडे पेट्रोलपंप